मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (17:31 IST)

कोंढव्यात बंदूक, तलवारी हवेत फिरवून तरुणांचा धुडगूस, हॉस्पिटलच्या काचा फोडल्या

कोंढव्यातील अशरफ नगर परिसरात काही तरुणांनी हातात तलवारी आणि बंदुकी घेऊन धुडगूस घालत धिंगाणा केला. बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पाडून नागरिकांना शिवीगाळ आणि धमक्या देत दहशत निर्माण केली. तर एका हॉस्पिटलच्या काचा देखील फोडल्या. सोमवारी आणि मंगळवारी लागोपाठ हा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दाखल केला आहे.
शहबाज उर्फ लंबु खान (वय 22), अरबाज उर्फ लंबू खान (वय 28) आणि त्याच्या इतर चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर ओबेदउल्ला अब्दुल रहीम खान (वय 33) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपिनी कोंढवा येथील अशरफ नगर परिसरात हवेत तलवारी फिरवून मोठमोठ्याने शिवीगाळ व आरडाओरडा करत नागरिकांना बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले. तसेच फिर्यादी यांच्या हॉस्पिटल समोर जाऊन त्यांच्या हॉस्पिटलची तलवारीने काच फोडून नुकसान केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.