रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 20 जुलै 2024 (16:54 IST)

पूजा खेडकरच्या आईच्या घरातून परवाना असलेले पिस्तूल आणि गोळ्या जप्त

पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या पुण्यातील राहत्या घरातून एक महागडी कार, परवाना असलेले पिस्तूल आणि तीन गोळ्या जप्त केल्या आहे. 

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना जमिनीच्या वादातून काही लोकांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
 
एका अधिकाऱ्याने सांगितले की, तिला रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक केली. त्या महाडच्या एका लॉज मध्ये लपून बसल्या होत्या. त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात आणले.
 
पुणे ग्रामीणच्या पौड पोलिसांनी खेडकर दाम्पत्य आणि इतर पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलमांखाली 323 (अप्रामाणिकपणे किंवा फसवणूक करून मालमत्ता काढून टाकणे किंवा लपवणे) आणि शस्त्रास्त्र कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
 
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) च्या उमेदवारीतील अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रमाणपत्रांबाबत तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तिच्या कार्यकाळातील वर्तनाबद्दल पूजा खेडकर यांची चौकशी सुरू आहे. 
दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्याशिवाय अन्य पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत पौर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Edited by - Priya Dixit