सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 7 जानेवारी 2024 (10:18 IST)

पुणे-लोणावळा या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द

पुणे-लोणावळा या मार्गावर पुणे विभागाद्वारे अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळादरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे, तर एक्सप्रेस गाडी उशिराने धावणार आहे.
 
अप मार्गावरील उपनगरी गाड्या रद्द
अप मार्गावरील पुण्याहून लोणावळ्यासाठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562, 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564, 3 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566, शिवाजीनगरहून तळेगाव करीता 3.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588, पुण्याहून लोणावळासाठी 4.26 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568, शिवाजीनगरवरून लोणावळाकरीता 5.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 या उपनगरी गाड्या रद्द राहतील.
 
डाऊन मार्गावरील उपनगरी गाड्या रद्द
डाऊन मार्गावरील लोणावळ्याहून शिवाजीनगरकरीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559, लोणावळ्याहून पुण्यासाठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561, तळेगाव येथून पुण्यासाठी जाणारी 4.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589, लोणावळ्याहून शिवाजीनगरकरीता 05.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565, लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 06.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 आणि लोणावळ्याहून पुण्यासाठी 7 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 या उपनगरी गाड्या रद्द राहतील.
 
गाडी क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस 03.30 तास उशिराने धावणार आहे. मध्य रेल्वेने म्हटले की, हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, अशी विनंती मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor