1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (07:12 IST)

मराठ्यांचा ओबीसीत समावेश नको, 24 जानेवारी, 18 फेब्रुवारीला ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चा

obc
मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करण्याला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. मराठा समाजातील काही नेत्यांनी मागणी केल्याने ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. याला विरोध करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी 24 जानेवारी आणि 18 फेब्रुवारीला मोर्चे काढण्यात येणार आहेत. या जनमोर्चात मंत्री विजय वडेट्टीवारही  सहभागी होणार आहेत.
 
ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाची बैठक पुण्यात झाली. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. या आंदोलनात राज्यातील मंत्री तसेच ओबीसी नेते विजय वडेट्टीवार सहभागी  होणार आहेत. राज्यात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, मराठ्यांचा ओबीसीत समावेश नको या मागणीसाठी हे आंदोलन करणार असल्याची माहिती जनमोर्चाच्या नेत्यांनी दिली. 
 
मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करावा ही मराठा समाजातील काही नेत्यांची मागणी आहे. या मागणीला ओबीसी व्हीजेएनटी  जनमोर्चा आक्रमकपणे विरोध करणार आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी 24 जानेवारी आणि 18 फेब्रुवारीला मोर्चे काढण्यात येणार आहे, अशी माहिती ओबीसी संघटनेकडून देण्यात आली.