शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 13 जुलै 2022 (15:05 IST)

पुणे आणि पिंपरी चिंडवडमधील शाळा बंद, उद्या पण शाळांना सुटी

school closed
पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.  दरम्यान पुढील दोन दिवसांत अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज पुणे आणि पिंपरी चिंडवडमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र पाऊस सुरूच असल्याने उद्या देखील शाळांना सुटी असणार आहे. उद्या पावसाचा अंदाज घेऊन निर्णय घेणार येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पिंपरी चिंडवड क्षेत्रात उद्या शाळेंना सुटी असल्याचे आदेश पिंपरी चिंडवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत. पिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यास्थितीत मुसळधार पाऊस पडत असून, येत्या दोन दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच सर्व खासगी शाळांना दिनांक 13  जुलै 2022 ते 14 जुलै 2022 पर्यंत सुटी रहाणार आहे. पावसाचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.