शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (23:28 IST)

हायटेंशन वायरचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

death
पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात रस्त्यावर पडलेल्या हायटेंशन वायरचा धक्का लागून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रोहित संपत थोरात असे या मयत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7 वाजेच्या सुमारास रोहित दूध आणण्यासाठी फुटपाथवरून जात असताना त्याचा पाय फुटपाथवर पडलेल्या हायटेंशन वायरवर पडला आणि त्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही वायर रात्री तुटून पडली होती. सकाळ पर्यंत वायर काढली गेली नव्हती. काही लोकांनी सांगितले की रोहितने हाताने ती वायर उचलली तर काही जणांनी त्याचा पाय वायरवर पडल्याचे सांगितले.रोहित आपल्या आईसोबत भाजी विक्रीचे काम करून घर चालवायचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची नोंद करून चौकशी करत आहे.