बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (12:59 IST)

Pune: कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून फरार

pune jail
कुख्यात गुंड आशिष जाधव हा येरवडा कारागृहातून फरार झाला असून तो कधी फरार झाला याचे उत्तर कारागृह प्रशासनाकडे नाही. सोमवारी दुपारी कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी कारागृहातील कैद्यांची मोजणी करता हा प्रकार उघडकीस आला. 

आशिष जाधव हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर 2008 साली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 
आशिष तेव्हा पासून येरवडा कारागृहात होता. त्याच्या वागण्याला पाहून येरवड्याच्या करागृहा प्रशासनाने त्याला रेशनविभागाच्या कामासाठी नियुक्त केले. या दरम्यान तो पसार झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. 
सोमवारी कारागृहातील कैद्यांची मोजणी केली असता आशिष कुठेच आढळला नाही. तो कारागृहातून फरार झाल्याचं लक्षात आलं. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 
 
 



Edited by - Priya Dixit