रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (20:42 IST)

Pune : पुण्यात एकाच ट्रॅकवर दोन मेट्रो, मेट्रो प्रशासन म्हणते...

delhi metro
Pune :पुणे मेट्रो कोणत्या न कोणत्या कारणात्सव चर्चेत असतात. एकाच ट्रॅकवर दोन मेट्रो आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर घटना छत्रपती शिवाजी नगर परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पुणे मेट्रोने स्पष्टीकरण देखील दिलं आहे.पुणे मेट्रोने असे काहीही घडले नसल्याचे म्हटले आहे. 
 
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एकाच ट्रॅक वर एक मेट्रो उभी असताना दुसरी मेट्रो येतांना दिसत आहे. सुदैवाने वेगात आलेल्या मेट्रो चालकाने ब्रेक लावल्याने मोठा अपघात टळला. एका नागरिकाने हा व्हिडीओ शूट केला आहे. 
 
या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना पुणे मेट्रोने माहिती दिली असून मेट्रोचे अधिकाऱ्यांनी सांगितले की,मेट्रोचा हा व्हिडीओ खालून घेतलेला असून दोन्ही मेट्रो एकाच ट्रॅक वर असल्याचा भास होत आहे. पण वास्तवात या दोन्ही मेट्रो वेगवेगळ्या मार्गावर आहे. सध्या मेट्रोची हॉर्न वाजवण्याची चाचणी सुरु असून मेट्रो डेपोमध्ये ये जा करत आहे. एक मेट्रो डेपोत जात आहे तर दुसरी मेट्रो डेपोतून मुख्य मार्गावर येत आहे.  
 


Edited by - Priya Dixit