गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (08:12 IST)

धक्कादायक ! मित्राच्या पत्नीची अश्लील छायाचित्रे बनवणारा होमगार्ड ‘गोत्यात’; जाणून घ्या प्रकरण

मित्राच्या पत्निच्या छायाचित्रामध्ये छेडछाड करुन अश्लिल इमेज तयार केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन एका होमगार्डला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे.
 
पोलीस निरीक्षक सुनील महाडिकयांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित विजय हटकर (रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती) असे अटक  करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो होमगार्ड म्हणून काम करतो. पीडित फिर्यादी महिला हटकर याच्या मित्राची पत्नी  आहे. त्यामुळे त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. त्यातूनच त्याची आणि मित्राच्या पत्नीची ओळख झाली होती. त्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्यासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील शेरेबाजी  केली. एवढ्यावर तो थांबला नाही तर महिलेच्या छायाचित्रात छेडछाड करत अश्लिल इमेजतयार केली.त्यानंतर त्याने हे फोटो तिच्या मोबाईलवर पाठवले. त्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे मेसेज पाठवले.त्यामुळे या महिलेने तात्काळ शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरु केला.आरोपीने स्वत:चा मोबाईल फोन बंद ठेवून देखील सायबर सेलच्यादतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली.