सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण

social media
Last Modified शुक्रवार, 2 जुलै 2021 (15:31 IST)
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या कुटूंबियानी त्याचे अपहरण करीत मुंडन केले आहे. या कुटूंबियास पोलीसांनी अटक केली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनाली राहूल निंबाळकर, राहूल दिगंबर निंबाळकर (रा.दोघे कोथरूड पुणे), निलेश सुरेश जाधव, सागर शिवाजी गायकवाड (रा.दोघे लक्ष्मीनगर,पर्वती पूणे) व जयसिंग कौर तेजींदरसिंह छाबडा (रा.सेंटर स्ट्रीट कॅम्प पुणे) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी विलास मलकान चव्हाण (१८ रा.नाना शिताने तांडा ता.जि.धुळे) या युवकाने तक्रार दाखल केली आहे.
निंबाळकर कुटूंबियातील विवाहीतेशी धुळे येथील तरूणाची ओळख झाली होती. त्यामुळे तो तिच्या संपर्कात होता. कालांतराने त्याने महिलेशी अश्लिल संभाषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने त्यास सज्जड दम भरला. तरीही तो महिलेस अश्लिल मॅसेज पाठवू लागला. ही बाब महिलेने पतीस सांगितल्याने त्याने मित्रासह पत्नीस सोबत घेवून धुळे गाठले. तरूणाचे घर गाठून संतप्त पुणेकरांनी त्यास बेदम मारहाण केली. तसेच त्यास बळजबरीने बसवून थेट नाशिकमधील पंचवटीतील फुलेनगर भागात नेवून त्याचे एका सलून दुकानात मुंडन केली. ही बाब नागरीकांनी पोलीसांना कळविल्याने हा प्रकार समोर आला असून पोलीसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक साखरे करीत आहेत.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

बर्गरमध्ये विंचू, अर्धा भाग चघळल्यानंतर तरुणाची पडली नजर, ...

बर्गरमध्ये विंचू, अर्धा भाग चघळल्यानंतर तरुणाची पडली नजर, घाबरत रुग्णालयात पोहोचला
राजस्थानची राजधानी जयपूरच्या मालवीय नगरमध्ये असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये काल रात्री गोंधळ ...

शिवसेनेच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता : प्रवीण दरेकर

शिवसेनेच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता : प्रवीण दरेकर
सरकार आघाडी सांभाळेल, तुमची आपली जबाबदारी काय आहे तर आपल्याला गाव सांभाळायचा आहे. हे गाव ...

गीते यांच्याविधानावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा ...

गीते यांच्याविधानावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा  पलटवार
शिवसेना नेते अनंत गीते यांनी शरद पवार आमचे गुरू होऊच शकत नाही, असं विधान केलं आहे. गीते ...

कर्ज वाढल्यानं ST चालकाने उभ्या बसमध्ये गळफास घेत संपवलं ...

कर्ज वाढल्यानं ST चालकाने उभ्या बसमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य
डोक्यावर कर्ज वाढल्यानं एसटी बसच्या एका चालकाने अहमदनगर मध्ये संगमनेर बस डेपो मध्ये ...

3 चिनी प्रवाशी 90 दिवस अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतले

3 चिनी प्रवाशी 90 दिवस अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतले
अंतराळात 90 दिवसाच्या मुक्कामानंतर शुक्रवारी 3 चिनी प्रवाशी पृथ्वीवर परतले.नी हाईशेंग, ...