मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

पनीर मक्खनी

साहित्य- 225 ग्रा.पनीर, 2 टे.स्पू. मक्खन (लोणी), 2 तेजपान (10 काळी मिरी), 2 इंच दालचिनी, 2 मसाला वेलची 8-10 लवंगा, 2 टे.स्पू. लसूण, आले पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या, 2 टे. स्पून साय, लाल तिखट, 2 टोमॅटो, 1 टी स्पून गरम मसाला, मीठ, 1 टी स्पून, साखर, 1 टी. स्पून कसुरी मेथी.

कृती- पनीरचे लहान चौकोनी काप करा, टोमॅटोची प्यूरी तयार करा. मायक्रोवेव्ह सेफ डिशमध्ये लोणी टाकून त्यात तेजपान- वेलची- दालचिनी, लवंगा- मिरी टाका. त्यात आले-लसूण पेस्ट, टोमॅटो प्यूरी, हिरव्या मिरच्या- लाल-तिखट- गरम मसाला- मीठ- साखर आणि १ वाटी पाणी टाकून एकत्र करून झाकण न ठेवता ५ मिनिट हायवर (100%) ठेवा, पनीरचे तुकडे व कसूरी मेथी एकत्र करून झाकण न ठेवता मध्यम तपमानावर (70%) ५ मिनिटं ठेवा, वरून साय पसरवून २ मिनिटे कमी तपमानावर (50%) ठेवा. गरमागरम वाढल्यास एकदम छान.