गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Modified गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (09:28 IST)

Raksha Bandhan : असावं हे बंधन खऱ्या प्रेमाचे

असावं हे बंधन खऱ्या प्रेमाचे,
एकमेकां विषयी च्या कळकळीचे,
नको असूया असावं प्रेमच ओतप्रोत,
एकाच बागेतील फुलं आपण आहोत,
आठवावं फक्त बालपण सदैव आपण,
निरागसते नी साजरा करत होतो सण,
देवाणघेवाणी ची नव्हती च न चिंता,
आनंदच सोबतीला तेव्हां आपल्या होता.
धावून जावं एकमेकांकडे अडीअडचणी ला,
हेच आश्वासन आज हवंय या राखी ला!!
..अश्विनी थत्ते