1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (11:06 IST)

उद्धव ठाकरेंच्या हस्ते अरविंद भोसले यांना 'सोन्याच्या चपला'

आरवली येथील वेतोबा मंदिरात 22 नोव्हेंबर रोजी होणार्‍या एका कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अरविंद भोसले या निष्ठावंत शिवसैनिकाला 'सोन्याच्या चपला' भेट करण्‍यात येणार आहेत.
 
शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले नारायण राणे यांचा राजकीयदृष्टय़ा जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत अनवाणी राहण्याची प्रतिज्ञा अरविंद भोसले यांनी केली होती. भोसले हे सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख आणि वरळीचे विभागप्रमुख म्हणून काम पाहतात.
 
बृहन्मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुदवडकर, आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत, तसेच मुंबई आणि सिंधुदुर्ग येथील शिवसैनिकांतर्फे भोसले यांना सोन्याच्या चपला दिल्या जाणार आहेत. 
 
निवडणुकीत राणे यांचा जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा भोसले यांनी 21 नोव्हेंबर 2005 मध्ये केली होती. विधानसभा निवडणुकीत राणे पराभूत झाल्यानंतर भोसले यांनी पायात चपला घालायला सुरुवात केली. भोसले यांना शिवसैनिकांनी तेराशे चपलांचे जोड दिले होते.