Last Modified: मुंबई , मंगळवार, 28 एप्रिल 2015 (11:49 IST)
कुंटे ‘आऊट’; मेहता ‘इन’
विकास आराखड्यावरुन रंगलेल्या गोंधळातून सीताराम कुंटे हे ‘आऊट’ झाल्यानंतर महापालिका आयुक्तपदाची धुरा पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव अजय मेहता यांनी सोमवारी हाती घेतली. त्यांच्यासमोर आता विकास आराखड्यासह मुंबईच्या नागरी समस्यांच्या प्रश्नांचे आव्हान तर आहेच शिवाय महापालिकेतील अंतर्गत राजकारणामुळे शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाला सामोरे जावे लागणार आहे.
‘हे पद मोठ्या जबाबदारीचे असल्याची जाणीव आहे़’ असल्याचे मार्मिक विधान त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले.