सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Updated :अहमदनगर , सोमवार, 19 सप्टेंबर 2016 (16:23 IST)

कोपर्डी : पीडित कुटुंबाला सुरक्षेसाठी शस्त्र परवाना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डीला भेट दिल्यानंतर, पीडित कुटुंबाला सुरक्षेसाठी तात्काळ शस्त्र परवाना देण्याचं अश्वासन दिलं होतं.  पीडित कुटुंबीयांना आज शस्त्र परवाना मिळणार आहे.

कोपर्डीतील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी आजोबांच्या घरुन आपल्या स्वत:च्या घरी जात होती. त्यावेळी तिघांनी शेतात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. तिची हत्या करण्याआधी तिच्या देहाची क्रूर विटंबनाही केली होती. याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडित कुटुंबाने शस्त्र परवाना देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. २४ जुलैला जिल्हा प्रशासनाला त्यासंदर्भात आदेश दिला होता. त्यानंतर आता सुमारे सव्वा महिन्यानंतर संबंधित फाईलवर सही झाली आहे. शस्त्र परवाना फाईलवर जिल्हाधिकाऱ्यांची सही झाल्याचं, शस्त्र परवाना विभागानं सांगितलं आहे.