शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 10 मे 2016 (12:41 IST)

गणेश नाईकांना राष्ट्रवादीला धक्का

नवी मुंबईत पार पडलेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत गणेश नाईकांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या मदतीने पालिकेच्या स्थायी समितीवर शिवसेनेचे शिवराम पाटील निवडून आले आहेत.

शिवराम पाटील यांनी अवघ्या एका मताच्या फरकानं राष्ट्रवादीच्या जे. डी. सुतार यांचा पराभव केला आहे. जे. डी. सुतार यांना सात तर शिवराम पाटील यांना आठ मतं मिळाली आहेत. काँग्रसेच्या सदस्य मीरा पाटील यांनी शिवसेनेला मत दिल्यानंच सेनेला हा विजय मिळवता आला.