गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दहीहंडीच्या थराला मर्यादा नको

मुंबई- दहीहंडीच्या थरांवर कोणतीही मर्यादा आणण्यात येऊ नये, या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
दहीहंडीसंबंधीचे नियम शिथिल करण्यासाठी सरकार हायकोर्टात गोविंदा मंडळांची बाजू मांडणार आहे. दहीहंडीच्या थरांवर कोणतीही मर्यादा नसावी व दहीहंडी फोडताना 12 वर्षीय मुलांना सहभागी होता यावे, यासाठी सरकार कोर्टात बाजू मांडणार आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत आमदार अँड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्रंसमोर दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांची बाजू मांडली. 
 
दहीहंडी उत्सवात 18 वर्षे वयाची अट पूर्ण करणार्‍या मुलांनाच सहभागी होता यावे असे मुंबई हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत.