गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By राकेश रासकर|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 2 ऑगस्ट 2007 (12:06 IST)

पद्म पुरस्कारांच्य शिफारशीसाठी समिती

विविध क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या राज्यातील व्यक्तीची पद्म पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस करण्याकरिता शासनाने सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्सीय समितीची स्थापना केली आहे.

ही समिती सन 2008 साली दिल्या जाणार्‍या पद्म पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करणार आहे.

वित्त व नियोजन मंत्री जयंत पा‍टील, पणन व रोजगार हमी योजना मंत्री हर्षवर्धन पाटील, शालेय शिक्षण मंत्री वसंत पुरके, सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक हे या समतिमध्ये असणा आहेत. तसेच मुख्य राजशिष्टाचार अधिकारीही या समतितीचे सदस्य असतील.

ही समिती राज्य स्तरावर प्रस्तावांची छाननी करून नावांची शिफारस केंद्राकडे करेल.