1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 30 सप्टेंबर 2015 (10:31 IST)

प्रभाकर जोग यांना लता मंगेशकर पुरस्कार

संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत तसेच भाव संगीतासाठी मोलाचे योगदान देणार्‍या ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना राज्य शासनाचा यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जावई माझा भलाह्य या चित्रपटासह २२ चित्रपटांना जोग यांनी संगीत दिले आहे. तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकार मदनमोहन, एस. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, खय्याम, ओ. पी. नय्यर, उषा खन्ना, जयदेव, रवींद्र जैन यांच्यासोबतही काम केले आहे.