1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (10:14 IST)

बारावीची परीक्षा फेब्रुवारीत; दहावीची मार्चमध्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते २८ मार्च तर दहावीची परीक्षा १ ते २९ मार्च या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांचे नियोजित वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.
 
परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी यंदा जुलै-ऑगस्ट महिन्यात फेरपरीक्षा घेण्यात आली. त्यामुळे यंदा शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरू होऊन सुमारे ३ महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर मंडळाने आपल्या संकेतस्थळावर परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. परंतु, परीक्षेपूर्वी शाळा, महाविद्यालयांना दिले जाणारे छापील वेळापत्रकच अंतिम असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.