गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

यंदा पाऊस 109 टक्के : स्कायमेट

मुंबई- दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर वरुणराजाची यावर्षी कृपा होणार असून सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 109 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामानविषयक अंदाज वर्तविणार्‍या कंपनीने व्यक्त केला आहे.
 
हवामानविषयीचा अंदाज व्यक्त करणारी स्कायमेट ही आघाडीची खासगी कंपनी आहे. या कंपनीने व्यक्त केलेल्या सुधारित ताज्या अंदाजानुसार गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस पडणार आहे. यंदा 109 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.
 
मासिक पावसाचा अंदाजजून : सरासरी 87 टक्के
सरासरी पावसाची शक्यता - 50 टक्के
सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता - 20 टक्के
सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता - 30 टक्के
 
जुलै : सरासरी 108 टक्के
सरासरी पावसाची शक्यता - 60 टक्के
सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता - 25 टक्के
सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता - 15 टक्के
 
ऑगस्ट : सरासरी 113 टक्के
सरासरी पावसाची शक्यता - 60 टक्के
सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता - 30 टक्के
सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता - 10 टक्के
 
सप्टेंबर : सरासरी 123 टक्के
सरासरी पावसाची शक्यता - 40 टक्के
सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता - 50 टक्के
सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता - 10 टक्के