शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

येत्या पाच दिवसात पुन्हा पाऊस

पुणे- राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाचा अंदाज आहे.
 
राज्यात सध्या पडत असलेला पाऊस, पूर्व मोसमी असून पुढील पाच दिवस हा पाऊस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
विदर्भ- मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हा पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र, हा पाऊस सर्वदूर पडणार नाही. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 7 ते 15 जून दरम्यान मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होते. मात्र, 20 मे नंतरच मान्सूनच्या आगमनाची अचूक माहिती वर्तविली जाऊ शकेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.