1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 19 ऑगस्ट 2015 (10:57 IST)

राजकारणंचे शिवप्रेम हे उसने : विश्वास पाटील

बाबासाहेब पुरंदरे हे केवळ ब्राह्मण समाजातील आहेत म्हणून त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करणे अत्यंत  चुकीचे आहे. तसेच शिवाजी महाराजांचे नाव घेऊन समाजात अशा प्रकारे जातीद्वेष पसरवणे अयोग्य असल्याचे सांगत ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी मंगळवारी बाबासाहेबांना देण्यात येणार्‍या पुरस्काराचे समर्थन केले. बाबासाहेब पुरंदरे यांचा होणारा सन्मान हा मराठी मातीचा सन्मान आहे. बाबासाहेबांनी कधीही ते इतिहासकार असल्याचा टेंभा मिरवला नाही. त्यांनी कायमच स्वत:ला शिवशाहीर म्हणवून घेतले. मात्र आता काही राजकीय पक्ष त्यांनी लिहिलेले शिवचरित्र चुकीचे असल्याचे सांगत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यापासून विरोध करत आहे