राज ठाकरेंचे बनावट 'फेसबुक' अकाऊंट, गुन्हा दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे बनावट फेसबुक अकाउंटप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात दादर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या नावाने अग्रेसर सोशल मीडिया साइट 'फेसबुक'वर अकाउंट तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. बनावट अकाउंट तयार करणार्या व्यक्तींनी राज यांच्या नावाने अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या आहेत. राज यांच्या नावाने चॅटिंग केल्याने हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी राज यांचे खासगी सचिव सचिन मोरे यांनी लेखी स्वरूपात पोलिसांना तक्रार दिली आहे.