1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

विजय मल्ल्याची 1,411 कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

मुंबई- आयडीबीआय बँकेच्या 900 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी मद्यसम्राट विजय मल्ल्या याची मुंबई आणि बंगळुरू येथील 1,411 कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याप्रकरणी ‘ईडी’ ही कारवाई केली आहे.
 
या मालमत्तेत मल्ल्याचे 34 कोटी रुपयांची बँकेतील रोख रAकम, मुंबई आणि बंगळुरू येथील घरे अनुक्रमे 1300 आणि 2291 चौरस ङ्खुटाची घरे, चेन्नई येथील 4.5 एकरचा औद्योगित भूखंड, कूर्ग येथील 28.75 एकरवरील कॉङ्खीची बागायत, युबी सिटी आणि बंगळुरू येथील निवासी तसेच औद्योगिक बांधकामे आदींचा समावेश आहे. विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवणारा मल्ल्या कारवाईच्या भीतीने 2 मार्च रोजी भारत सोडून पळून गेला आहे.