शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 10 मे 2016 (12:47 IST)

शॉर्ट ड्रेस घातला म्हणून तरुणीला मारहाण

शॉर्ट ड्रेस घातला म्हणून पाच जणांनी तरुणीला मारहाण केली. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
आरोपींनी तिला केसाने ओढून गाडीतून बाहेर काढले आणि मारहाण केली. 'आमच्या कुटुंबातील कोणतीच मुलगी असे तोकडे कपडे घालत नाही, आणि सकाळी 5 वाजता पुरुषांसोबत अशी फिरत नाही', असं म्हणत आरोपींनी मारहाण केल्याची माहिती पिडीत तरुणीने दिली आहे.

तरुणीने पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र एक आठवडा उलटून गेला तरी पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिका-याशी संपर्क साधल्यानंतर कारवाई करण्यात आली असं पिडीत तरुणीने सांगितलं आहे.

ज्या पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस आय़ुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली आहे.