1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (12:14 IST)

सासूला ऑनलाईन विकायला निघाली सून...

मुंबई- सासू- सुनांचे भांडण काही नवीन नाही पण हद्द तेव्हा झाली जेव्हा एका सुनेनी या गोष्टीचा तमाशा केला. मुंबईत घडलेल्या या घटनेची चर्चा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे. येथील एका नाराज सुनेनी आपल्या सासूला ऑनलाईन विकण्यासाठी जाहिरात दिली असून तिचे फोटोही इंटरनेटवर प्रसिद्ध केले.
 
सुनेनी फायदा डॉट कॉम शॉपिंग साईटवर 'मदर-इन-लॉ इन गुड कंडिशन' (चांगल्या परिस्थिती सासू) नावाने जाहिरात टाकली. येथे तिने सासूचा फोटोही टाकला आणि वैशिष्ट्रये यात भडास काढत खूप वाईट- साईट लिहिले आहे. सुनेच्या या कारनाम्याची जमून चर्चा होत आहे.