बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 22 जून 2016 (10:25 IST)

हत्येसाठी वापरलेली मोटरसायकल तावडेची

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल वीरेंद्र तावडेची होती, अशी माहिती सीबीआयच्या सुत्रांनी दिली आहे.

ठाण्यात आणि गोव्यात झालेल्या बॉम्बस्फोटामागे हिंदू जनजागरण आणि सनातनच्या साधकांचा हात असल्याचा दावा सीबीआयच्या सुत्रांनी केला आहे.

तावडेच्या मोटरसायकलचा वापर आरोपी सारंग अकोलकरनं दाभोलकरांच्या हत्येसाठी केल्याचं सीबीआय सुत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान,सीबीआयनं आरोपी वीरेंद्र तावडेची पत्नी डॉ निधी यांची कसून चौकशी केली. त्या चौकशीदरम्यान महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. दाभोलकर आणि पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचं पथक जतमध्ये दाखल झालं आहे.