नगर जिल्ह्यातील 1042 जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन

Shankarrao Gadakh
Last Modified गुरूवार, 26 मे 2022 (21:49 IST)
सिंचनातून समृद्धी वाढविण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेली मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक तलावांची डागडुजी, दुरुस्ती करुन साठवण क्षमता व सिंचन क्षमता पुनरस्थापित करण्यात येणार आहे,असे मृद व जलसंधारण मंत्री श्री. शंकरराव गडाख यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्री जलसंधारण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत मंत्री श्री. गडाख यांनी बैठक घेवून कामांचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. पावसाच्या पाण्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. या माध्यमातून शेती सिंचन क्षेत्र वाढतानाच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागणार आहे, त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. गडाख यांनी दिल्या.
मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून अहमदनगर जिल्ह्यातील 1042 जलस्त्रोतांचे पुनर्जीवन केले जाणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे 698आणि विभागाच्या राज्य जलसंधारण कामांचा 344 समावेश असुन रु 182 कोटी प्रशासकिय मान्यता किंमत असल्याची माहिती जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

सिंचन आणि पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या योजनेतून शेतीला संरक्षित सिंचन उपलब्धकरतानाच पाणी पुरवठा योजनांसाठीही जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केले जाते. जलसंधारण विभागामार्फत ही कामे केली जाणार असुन जलसंधारण विभागाकडे तांत्रिक मान्यता, प्रशासकिय मान्यता, निविदा प्रक्रिया, कार्यादेश देण्याबाबत पुढील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अभियंत्यानाही सामावून घेतले आहे.
राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबविला जात असून सन 2022 च्या पावसाळ्यापूर्वी संबंधित कामेपूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना आहेत. त्यानुसार अहमदनगरच्या कामांना डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मंजुरी मिळालेली आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या 868 पैकी698 कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्याची अंदाजपत्रकीय किंमत रु. 114 कोटी असुन जलसंधारण विभागाच्या344 कामांची प्रशासकीय मान्यता किंमत रु. 69 कोटी आहे असेही मंत्री श्री. गडाख यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

'त्या' मूर्तीवर ‘पीओपी’ची असल्याचे नमूद करणे बंधनकारक

'त्या' मूर्तीवर ‘पीओपी’ची असल्याचे नमूद करणे बंधनकारक
यंदा गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे आणि ...

पुढील पाच दिवस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज ...

पुढील पाच दिवस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागाने पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाची इशारा ...

Cristiano Ronaldo: रोनाल्डो चॅम्पियन्स लीग खेळण्यासाठी 11 ...

Cristiano Ronaldo: रोनाल्डो चॅम्पियन्स लीग खेळण्यासाठी 11 महिन्यांपूर्वी मँचेस्टर युनायटेड सोडणार
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड क्लब सोडण्याच्या ...

गणेशोत्सवासाठी यंदा मध्य रेल्वेकडून 74 विशेष गाड्या

गणेशोत्सवासाठी यंदा मध्य रेल्वेकडून 74 विशेष गाड्या
गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने 74 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३ मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३ मोठ्या घोषणा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत चाचणीमध्ये यश ...