मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 फेब्रुवारी 2025 (19:06 IST)

वर्ध्यात इंस्टाग्राम पोस्टवरून 17 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

murder
आजकाल लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रिल्स बनवतात आणि शेअर करतात. लाईक्स मिळवण्यासाठी जीवाशी धोका देखील पत्करतात. 
या रिल्समुळे कधी कधी त्यांना आपला जीव गमवावा लागतो. अशीच घटना वर्धा जिल्ह्यातून समोर आली आहे. वर्ध्यात इंस्टाग्रामच्या एका पोस्टवरून झालेल्या वादातून एका तरुणाने 17 वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून केला. 
सदर घटना शनिवारी हिंगणघाटच्या पिंपळ गावात घडली. एक महिन्यांपूर्वी मयत मुलाने आणि आरोपीने  सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली होती. 
या स्टोरीवर दोघांनी यूजर्सला मतदान करण्यास सांगितले. या स्टोरीवर पीडित मुलाला आरोपीपेक्षा जास्त मते मिळाली होती. त्याचा राग आरोपीला आला आणि दोघांमध्ये वादावादी झाली. या वर आरोपीने त्याच्या मित्रासह अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला केला आणि त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit