1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (16:09 IST)

24 तास उलटले, तरीही यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरूच

शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी शुक्रवारी सकाळी केंद्रीय आयकर विभागाने छापेमारी केली. गेल्या 24 तासांपासून आयकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या घरी तपास करत आहेत. त्यामुळे त्यांच्याहाती काय लागले आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास केंद्रीय आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला. यशवंत जाधव हे मागील पाच वर्षांपासून स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून 15 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष असल्यापासून टेंडरच्या माध्यमातून हा पैसा फिरवण्यात आला. त्यांनी परदेशात पैसा लपवून ठेवला असल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. तसेच मुंबई महापालिकेत दरवषी किमान 6 हजार कोटींचे टेंडर पास होतात. 25 वर्षाचा हिशोब लावला तर किमान दीड लाख कोटींचा भ्रष्टाचार स्थायी समितीच्या माध्यमातून शिवसेनेने केला आहे, असाही आरोप भाजपकडून करण्यात आला होता.