शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (16:02 IST)

करारा जवाब…!’, मलिकांकडून अभिनेता मनोज वाजपेयीचा व्हिडीओ शेअर

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची बुधवार दि. २३ रोजी ईडीने चौकशी केली. सलग आठ तासांच्या चौकशीनंतर अखेर मालिकांना अटक करण्यात आली. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले. त्यांनतर त्यांना चौकशीसाठी घेऊन गेले. चौकशी नंतर मालिकांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना सेशन कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांना ३ मार्पर्यंत ईडीची कोठडी दिली आहे.
 
दरम्यान नवाब मलिक यांची प्रकृती खालवल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले. यावेळी त्यांना रुग्णालयात जास्त वेळ ठेवण्यात आलं होतं. यानंतर मलिकांनी पुन्हा एकदा ट्वीट केलं आहे. मालिकांनी अभिनेता मनोज बाजपेयीचा व्हिडीओ शेअर केला आहे. करारा जवाब मिलेगा ! असं कॅप्शन देत हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.