शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (16:05 IST)

गॅसची डिलरशिप :सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाची फसवणूक केली

भारत गॅसची डिलरशिप देतो, असे सांगून बनावट मेलद्वारे खोटी शासकीय कागदपत्रे देत सायबर चोरट्यांनी नगर तालुक्यातील जेऊरच्या व्यावसायिकाची फसवणूक केली आहे.
पाच लाख 27 हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 3 फेब्रुवारी 2022 ते 16 फेब्रुवारी 2022 दरम्यान ही घटना घडली असून शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 रोजी हा गुन्हा दाखल झाला आहे.
व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूक करणार्‍याविरूध्द भादंवि कलम 419, 420, 468, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधि 2000 चे कलम 66 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी यांना एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. भारत गॅस एजन्सीमधून असिस्टंट मॅनेजर हरीष रावत बोलतो, असे सांगितले.तुम्हाला भारत गॅसची डिलरशिप देतो, असे सांगून फिर्यादीचा विश्‍वास संपादन केला. त्यांच्यात बोलणे होऊन समोरच्या व्यक्तीने फिर्यादीला बनावट मेलद्वारे खोटी शासकीय कागदपत्रे पाठवून पाच लाख 27 हजार रूपये घेत त्यांची फसवणूक केली.सदरचे पैसे त्या व्यक्तीने युको बँकेच्या खात्यावर घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले पुढील तपास करीत आहेत.