बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2023 (21:15 IST)

आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्वीट, ट्वीट करणाऱ्या इसमां विरोधात गुन्हा दाखल

Jitendra Awhad
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्वीट करण्यात आले होते. हे अश्लील ट्वीट करणाऱ्या इसमाविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरवर @अक्षय नावाच्या एका ट्विटर हँडलरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अश्लील शिविगाळ करणारी पोस्ट शेअर करण्यात आली होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे उथळसर ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे आणि सोशल मीडियाचे प्रमुख जतीन कोठारी यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
समीर पेंढारे आणि जतीन कोठारी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांची भेट घेऊन रितसर फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी भादंवि 297 आणि माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008 च्या कलम 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor