शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (17:48 IST)

कोल्हापुरात पाच वर्षाच्या मुलीला सावत्र आईने चटके दिले

आई आणि मुलाचे नाते वेगळेच आहे. पण आईच्या नावाला काळिमा लावण्याची धक्कदायक घटना कोहापुरातून समोर आली आहे. या चिमुकलीने अंथरुणावर लघवी केली म्हणून तिच्या सावत्र आईने तिला गरम चिमट्याने प्रायव्हेट पार्ट, पाय, हात आणि तोंडाला, गळ्याजवळ चटके दिले. 

कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यात कासारवाडी येथे शुभम मोकिंदराव मगरे हे आपली पत्नी, एक मुलगी आणि दोन मुलांसह राहतात. पूजा आणि शुभम यांचे हे दुसरे लग्न असून दोघांना पहिल्या लग्नापासून अपत्ये आहे. शुभमला एक मुलगी आणि पूजाला दोन मुले आहे.  पोलिसांच्या चौकशीत मुलीने अनेकदा बेडवर लघवी केल्याचे समोर आले. या गोष्टीवरून पूजा त्याला रोज मारहाण करायची.

आजूबाजूच्या लोकांचा आरोप आहे की ती तिची सावत्र आई असल्याने तिला मुलीबद्दल फारसे प्रेम नव्हते. ती अनेकदा त्याला मारहाण करत होती आणि दूध प्यायला देत नव्हती.शुभम हे शुक्रवारी कामानिमित्त बाहेर गेले असता पूजाने पाच वर्षाच्या मुलीला अंथरुणात लघवी केल्याच्या कारणावरून गरम चिमटा लावून चटके दिले.

मुलीच्या अंगावर जखमा आल्या आहे. या घटनेची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली असून पूजाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी पतीचे जबाब घेऊन पुढील तपास सुरू आहे.
Edited by - Priya Dixit