गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (20:46 IST)

साईभक्त महिलेने अंगावरील सोन्याचे सर्व दागिने केले अपर्ण

शिर्डीतील साईबाबांच्या चरणी  हैदराबादमधील साईभक्त महिलेने एकूण 7 लाख रुपयांचा 15.300 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण केलाय.  आपल्या पतीच्या निधनानंतर हैद्राबाद येथील साईभक्त महिलेने अंगावरील सोन्याचे दागिने एकत्रित केलं. सर्व अलंकार एकत्र करत 7 लाख 10 हजार रुपये किंमतीचा 15. 300 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार साईंचरणी अर्पण केला आहे. 
 
हैद्राबाद येथील साईभक्त श्रीमती पोलावर्णम कल्याणी यांनी शिर्डीला येत साईंच्या चरणी नतमस्तक झाल्या. आपल्या अंगावरील दागिने एकत्रित केले.  सोन्याचा हार बनवला. हा सोन्याचा हार  साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे सुपुर्त केला. साईबाबांनी प्रत्येक अडचणीतून मुक्त केलं. कृतार्थतेची भावना साईबाबांच्या चरणी अर्पित व्हावी म्हणून हैद्राबाद येथील साईभक्त महिलेने सोन्याचा हार साईबाबांच्या चरणी अर्पित केला आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor