मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 मार्च 2024 (10:06 IST)

येवल्यात कापड दुकानाला भीषण आग; ३ कारागिरांना वाचविण्यात यश

fire
शहरातील मेनरोड येथील कापड बाजारातील पारख क्लॉथ स्टोअर या कापड दुकानात रात्री 11.30 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांची वित्तहानी झाली असून, दुकानात झोपलेल्या तीन कारागिरांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
 
येवला शहरात मेनरोडवर कापड बाजार असून, त्या ठिकाणी पारख क्लॉथ सेंटर नावाचे साडीचे व रेडिमेड कापड दुकान आहे. रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकानाचे मालक दुकान बंद करून गेले. रात्री साडेअकराच्या सुमारास दुकानातून अचानक धुराचे लोट बाहेर येताना काही नागरिकांना दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. यावेळी येवला अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले; मात्र ही आग इतकी भीषण होती, की मनमाड व कोपरगाव येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor