शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2017 (11:33 IST)

उरुळी कांचनजवळ भीषण अपघात, २ ठार तर ६ जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनजवळ शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.  यात रस्त्यावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठीमागून येणा-या टॅकर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने शैहफान व त्यांचा भाऊ महेश हा रस्त्यावर उतरून पाहणी करत असताना मागून  भरधाव वेगाने आलेल्या टँकरने ट्रकला धडक दिली. या अपघातात अंकुश राजाभाऊ पंडीत (14 ) व टँकरचालक एकनाथ विश्वनाथ बाचारे (37) यांचा जागीच मृत्यू झाला. टॅकरमधील प्रवासी मेघराज नाथाराव हनवटे (36), राजू विश्वनाथ पंडीत (35), कांताबाई मरीबा उजगर (45), इंदु राजु पंडीत ( 33), व ट्रकचालक शैहफान दशरथ शेख (23) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.