सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑगस्ट 2023 (07:11 IST)

राष्ट्रवादीच्या महीला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी ॲड.रोहिणी खडसे !

Rohini Khadse
जळगाव मिरर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे 

दि 29 रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी यांनी ॲड.रोहिणी खडसे यांना महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र दिले.
 
यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई ताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, मावळत्या महीला प्रदेशाध्यक्ष विद्या ताई चव्हाण, माजी मंत्री आ एकनाथराव खडसे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आ.नवाब मलिक, आ.बाळासाहेब पाटिल आ शशिकांत शिंदे. हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
 
ॲड.रोहिणी खडसे या माजी मंत्री आ .एकनाथराव खडसे यांच्या कन्या असून त्या उच्च शिक्षित आहेत त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली असुन त्यांचें पदव्युत्तर शिक्षण वकिली क्षेत्रात मुंबई विद्यापीठातून एल एल बी, तर पुणे विद्यापीठातून एल. एल. एम पर्यंत झालेले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी आ. एकनाथराव खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक शिक्षण व विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका आहेत त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जळगाव जिल्हा मध्य बँक ऑडिट मध्ये ” ड” दर्जा वरून” अ” दर्जामध्ये आली होती त्यांच्या कार्यकाळात बँकेचे संगणकीकरण, ए टी एम , सी बी एस प्रणाली सेवा सुरू झाली होती तसेच बँकेच्या ठेवी मध्ये आणि भाग भांडवलामध्ये वाढ झाली होती . त्यांच्या कार्यकाळात बँकेने आघाडी घेऊन विविध क्षेत्रात पुरस्कार मिळवले होते याशिवाय मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा असून त्यांनी आ.एकनाथराव खडसे यांनी स्थापना केलेली परंतु काही कारणाने अपूर्णावस्थेत असलेली सूतगिरणी सुरू करून स्थानिक महीला व युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor