बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (20:54 IST)

अजित पवार गटाचं X अकाउंट सस्पेंड, नेमकं कारण काय?

ajit panwar
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ट्विटर हॅण्डल सस्पेंड करण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासून हे ट्विटर हॅण्डल सस्पेंड आहे. तसा मेसेज देखील अजित पवार गटाच्या ट्विटर हॅण्डलवर दिसत आहे. शरद पवार गटाने तक्रार केल्यानंतर एक्सकडून ही कारवाई करण्यात आली.
 
राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर  शरद पवार गट आणि अजित पवार गट वेगळे झाले आहेत.दरम्यान पक्षासोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही विभागले गेले आहेत. मात्र आता अजित पवार गटाचं एक्स म्हणजे जुनं ट्विटर अकाऊंट सस्पेंड झालं आहे. ट्विटरने ही कारवाई केली आहे.
 
अजित पवार गटाचं एक्स अकाऊंट मागील दोन दिवसांपासून सस्पेंड करण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ट्विटरकडून  ही कारवाई करण्यात आली आहे.  
 
NCP speaks1 नावाने अजित पवार गटाचे ट्विटर हॅण्डल आहे. याबाबत अजित पवार गटाने माहिती देताना म्हटलं की, आपलं म्हणणं ट्विटरला कळवलं असून हे ट्विटर हॅण्डल आज सुरू होईल.
 
 नियम उल्लंघन झाल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याने एक्स अकाऊंट सस्पेंड करण्यात आल्याची माहिती आहे. तसा मेसेज देखील अजित पवार गटाच्या ट्विटर अकाऊंटवर दिसत आहे. मात्र नेमकं कारण काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor