शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (22:41 IST)

अजित पवारांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं, आम्ही त्यांना केंद्रात मोठं पद देऊ

supriya sule
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आज पुण्यात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे. १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला वळवल्यावरून सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं आहे. त्यांनी घरगुती दौरे बंद करावेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करावं, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी याहून मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं आहे. या आश्वासनाची सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला आहे. “मी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देते की, त्यांनी अजित पवारांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं, आम्ही त्यांना केंद्रात मोठं पद देऊ…” असा उपरोधिक टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.