रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (12:48 IST)

Andheri : 8 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

minor
Andheri :सध्या देशात बाल लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. अत्याचार करणारा नात्याच्या किंवा ओळखीचाच असतो. सरकारने यावर आळा घालण्यासाठी pocso कायदा काढला आहे. या मध्ये आरोपीला अटक करून कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे. मुंबईच्या अंधेरीपूर्व  भागात एका 53 वर्षीय नराधमाने 8 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक केले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या अंधेरी पूर्व येथे पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह ज्या इमारतीत पहिल्या मजल्यावर राहते त्याच इमारतीत आरोपी आपल्या कुटुंबासह तळमजल्यावर राहतो. आरोपीचा पीडित मुलीच्या कुटुंबाशी चांगला घरोपा आहे. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या आईला नौकरी मिळाली.

कामावर जाताना तिने मुलीची जबाबदारी आरोपीच्या कुटुंबाबर टाकली. आई कामावर गेल्यावर आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. सदर घटना 7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान घडली आहे. मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने तातडीनं आरोपीच्या विरोधात मेघवाडी पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला .मेघवाडी पोलिसां कडून या प्रकरणावर तातडीनं कायदेशीर कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. 
 
 Edited by - Priya Dixit