शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (09:50 IST)

जवानांच्या कामगिरीचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घेऊ नेये - उद्धव ठाकरे

पाकिस्तान गाढ झोपला असताना मध्यरात्री साडेतीन वाजता, आपल्या देशाच्या वायुदलाच्या १२ लढाऊ मिराज विमानांनी २१ मिनिटे पाकिस्तानात शिरून जैश ए मोहम्मदचा अतिरेकी अड्डा उद्ध्वस्त केले आणि ३५० अतिरेक्यांना ठार केले, त्यांच्या या शौर्याच्या कामगिरीचे मी मनपासून फार कौतुक करतोय, मात्र जवानांच्या या शौर्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षांनी घेऊ नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर पाकिस्तानने वैमानिक अभिनंदन याला जेरबंद केले. त्यांची लवकरात लवकर सुखरूप सुटका केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा केला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. 
 
पुलवामात १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला होता, यामध्ये आपले 40 जवान शहीद झाले, त्यावेळी \युतीची बोलणी सुरू होती. त्यावरुन भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका झाली होती. यावरही उद्धव ठाकरे म्हणाले की युती होत नव्हती त्यावेळी टीका सुरू होती. युती झाल्यावरदेखील टीका सुरू असून, जर युती झाली नसती, तर ५० वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसच्या हातात देश गेला असता आणि हिंदुत्व मागे पडले असते,' असे उद्धव म्हणाले आहेत.