शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (21:56 IST)

पत्राचे वाचन करत आशिष शेलार यांची राहुल गांधींवर टीका

ashish shelar
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्त्यव्य केल्यानंतर  मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी इंदिरा गांधी यांनी सावरकरांसाठी लिहिलेल्या पत्राचे वाचन करत राहुल गांधींवर टीका केली आहे.
 
या पत्रकार परिषदेत आशिष शेलार म्हणाले; इंदिरा गांधी यांनी स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारताचे सुपुत्र आहेत. वीर सावरकर म्हणून इंदिरा गांधी यांनी सावरकरांचा पात्रात उल्लेख केला आहे आणि राहुल गांधी यांनी स्वतः त्यांच्या भाषणात वीर या शब्दावर ताशेरे ओढले तेव्हा राहुल गांधींनी त्यांच्या आजीचे पत्र वाचले नाही असं आशिष शेलार म्हणाले.
 
इंदिरा गांधींचे पत्र वाचताना शेलार पुढे म्हणाले; सावरकर धाडसी होते असे इंदिरा गांधी म्हणतात. त्याचबरोबर सावरकरांनी ब्रिटिशांविरोधातील लढ्यात जे योगदान दिले याची नोंद इतिहासात होईल. असे अशील शेलार म्हणाले.
 
या संदर्भतच पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, राहुल गांधींनी नेहरू वाचले नाहीत, इंदिरा गांधींचा अभ्यास केला नाही. आता केवळ केरळ मध्ये सत्ता आल्यानंतर केवळ हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं एवढाच राहुल गांधींनी अभ्यास केला. राहुल गांधींचे हे विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे असं म्हणत आशिष शेलारांनी राहुल गांधींना टोला लगावला. त्याच बरोबर राहुल गांधींच्या या विधानाचा निषेध करत असल्याचे शेलार म्हणाले. राहुल गांधींच्या बुद्दीवर हिरवं झाकण बसलं आहे त्या राहुल गांधींना भगव्या आणि हिंदुत्वाची ताकद कळणे कठीण असे असेही शेलार म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor