गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2022 (08:21 IST)

सावंतवाडीत ”जुन्या आठवणी जागवा आणि व्यक्त व्हा” हा उपक्रम 10 डिसेंबरला

sawantwadi
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्यावतीने संस्थानकालीन सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी जागवा आणि व्यक्त व्हा हा उपक्रम शनिवारी 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीराम वाचन मंदिर समोरील मोती तलावाच्या सेल्फी पॉइंट कट्ट्यावर होणार आहे. अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ऍडवोकेट संतोष सावंत व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली संस्थानकालीन पूर्वीची सावंतवाडी आणि सावंतवाडी शहरातील अनेक आठवणी जुन्या जाणत्या व्यक्तीने पाहिल्या आहेत अनुभवले आहेत . आता बदलती सावंतवाडी आणि या बदलत्या सावंतवाडीतील जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या दृष्टीने सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी जागवा आणि व्यक्त व्हा हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

सेल्फी पॉईंट येथील कट्ट्यावर सावंतवाडी काठावरची सायंकाळ अनुभवता यावी यासाठी सावंतवाडी शहराच्या जुन्या आठवणी जागवल्या जाणार आहेत. नाविन्यपूर्ण असा हा उपक्रम असून ज्यांनी सावंतवाडीतील जुन्या आठवणी प्रसंग व अनुभवलेले क्षण असतील त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे व आपली नावे येत्या आठ डिसेंबर पर्यंत सहसचिव राजू तावडे व सचिव प्रतिभा चव्हाण यांच्याकडे नोंदवावीत जुन्या आठवणी व्यक्त होण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिकांनी व साहित्यिकांनी आपली नावे नोंदवली आहेत .
 
Edited by: Ratnadeep Ranshoor