मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 जानेवारी 2019 (10:25 IST)

भुजबळ यांची टीका : अबकी बार छम छम सरकार

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी डान्सबारप्रकरणी आपल्या अनोख्या शैलीत सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप सरकार एकीकडे म्हणते गाईला वाचवा आणि दुसरीकडे म्हणते बाईला नाचवा. पुन्हा छम छम बार हेच आमचे बीजेपी सरकार. अबकी बार छम छम सरकार, अशा शब्दात भुजबळ यांनी भाजप सरकारची खिल्ली उडविली. निर्धार परिवर्तनाचा संपर्क यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जाहीर सभेत भाजपवर टीकास्त्र सोडले. 
 
डान्सबारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतर राज्यातील सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. भाजप-शिवसेना सरकारला मोठे अपयश आले आहे. न्यायालयात चांगली बाजू मांडण्यासाठी वकील दिला नाही. त्यामुळे ही वेळ राज्यावर आली आहे. राष्ट्रवादीने डान्सबारवरील बंदी उठल्याने भाजपला जोरदार टोला लगावला आहे.