रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (15:32 IST)

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ‘चेन स्नॅचिंग’, बोल बच्चन गॅंग सक्रिय

नाशिक शहरातील सिडको भागात एका महिलेला पत्ता विचारणाऱ्या दोघांनी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केल्याची घटना घडली आहे. उत्तम नगरच्या ओम कॉलनीतील हा प्रकार असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नाशिक शहरात आता दिवसा ढवळ्या देखील चेन स्नॅचिंग चे प्रकार घडू लागले आहेत. रोजच कुठे ना कुठे चेन स्नॅचिंग होताना दिसत आहे. आजचा प्रकार आहे सिडको परिसरातील. सकाळी अकराच्या सुमारास दोन बाईक स्वार चक्कर मारत होते. यावेळी एका घराच्या समोर येऊन थांबले असता घरातील महिलेला आवाज दिला.
महिला त्यांच्या समोर आल्यानंतर एकाने तिला बोलण्यात गुंतविण्यास सुरवात केली. तसेच पत्ता विचारण्यास सुरवात केली. अन काही क्षणातच त्याने वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळ्याचं मंगळसूत्र ओढून चोरटे फरार झाले.
सदर घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ६० वर्षीय महिलेला घराबाहेर बोलवून चेनस्नॅचिंग करण्यात आली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून चेन स्नॅचिंग आळा कधी बसणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.