गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 25 मे 2017 (13:29 IST)

Devendra Fadnavis यांचं हेलिकॉप्टर कोसळलं, सुरक्षित

लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर निलंग्यानजीक कोसळले. सुदैवाने फडणवीस यांना दुखापत झालेली नाही. स्वत: मुख्यमंत्र्यांनी ‍ट्वीट करून ही माहिती दिली आहे. हेलिकॉप्टरमध्ये असलेले चारही जण सुरक्षित आहेत.

 
मी आणि माझी टीम सुरक्षित आहे. कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती पुरवत स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट केले. नंतर एक व्हिडिओ जारी करत स्वत:च्या आणि टीमच्या सुखरूप होण्याची माहिती दिली. 
 
हेलिकॉप्टरचे मोठं नुकसान झालेय. घटनेनंतर तातडीने सीएम यांना बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या घरी नेण्यात आले.