शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:50 IST)

नाशिककरांना दिलासा :शहरातील पाणी कपात रद्द

पाणी कपातीबाबत नाशिककरांसाठी मोठी बातमी आहे. नाशिक शहरातील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ही माहिती दिली.
 
जून महिन्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात नाशिक जिल्ह्याकडे मान्सूनच्या पावसानं पाठ फिरवली होती.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणी साठी 50 टक्केंच्या खाली आल्यानं शहरात दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र, गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणासह इतर धरणांमध्ये देखील मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेली पाणीकपात रद्द करण्यात आली. आयुक्तांच्या पाणीकपात रद्द च्या घेण्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे
 
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरणातील विसर्ग हा थांबवण्यात आला आहे.पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला असून गेल्या पाच दिवसांपूर्वी हा विसर्ग 3000 क्यूसेक पर्यंत वाढविण्यात आला होता. आता गंगापूर धरणात 76 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत आहे