1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (16:37 IST)

पुणे, नाशिकच्या सुरक्षिततेसाठी नगर जिल्ह्यात लाॅकडाउनचा निर्णय

Decision of lockdown in Nagar district for security of Pune
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर  जिल्ह्यातील 61 गावांवर लावण्यात आलेल्या निर्बंधावरुन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पारनेर आणि संगमनेर तालुक्यात कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने नगर जिल्ह्यातील 61 गावात निर्बंध लावण्यात आले आहेत. पुणे आणि नाशिक जिल्ह्याला फटका बसू नये यासाठी आत्ताच नगर जिल्ह्यातील 2 तालुक्यातील रुग्ण संख्या राेखण्यासाठी निर्णय घेतला आहेअसं अजित पवार  म्हणाले आहेत.
 
अजित पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सातारा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना अजित पवार  म्हणाले की, नगर जिल्ह्यातील 61 गावांत लॉकडाउन करण्यात आलाय. याविषयी अजित पवार यांनी पारनेर आणि संगमनेर तालुक्यात कोरोना बाधितांत वाढ झाल्याने निर्णय घेतला असल्याचं म्हटले. तर, पुणे आणि नाशिक जिल्हा या 2 तालुक्यांना लागून आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या रोखली पाहिजे नाहीतर याचा फटका पुणे आणि नाशिकला बसू शकतो. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
पुढे अजित पवार म्हणाले, 12 ते 18 वर्षाच्या मुलांचे लसीकरण करावे अशी चर्चा आहे.अद्याप केंद्राकडून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्राचा निर्णय झाल्यावर लसीकरण सुरू केले जाईल.परंतु मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा असून अद्याप मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नसल्याचंही ते म्हणाले.